लातूर-औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक अपघातात निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखून बस मोकळ्या जागेत नेल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.


